शालेय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्याच्या सिध्दार्थ देशपांडेला सुवर्णपदक

मुंबई विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्याच्या लोढा वर्ल्ड स्कूलच्या सिध्दार्थ देशपांडे यानं १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तसंच १४ वर्षाखालील मुलींच्या गटात ठाण्याच्या हिरानंदानी फौंडेशन स्कूलनं सुवर्णपदक पटकावलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि युवक संचलनालयाने तसंच पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, आर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं अलिकडेच १४, १७ आणि १९ वर्षाखालील मुलं-मुली सांघिक गटात स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत १३ विभागांमधील ७८ खेळाडू सहभागी झाले होते. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकाचे खेळाडू तर प्रत्येक गटातील विजेता संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात ठाणे शहर संघ विजेता ठरला तर १९ वर्षाखालील मुलांच्या गटात ठाणे ग्रामीण संघ विजेता ठरला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading