court crime

ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात बलात्काराच्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान एका महिलेचा विनयभंग होण्याची घटना

ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात बलात्काराच्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान एका महिलेचा विनयभंग होण्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विनयभंग करणारा बलात्कार पिडीत मुलीचा पिता असून तक्रारदार महिला बलात्कारातील आरोपीची पत्नी आहे. नवी मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यात बलात्काराचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील आरोपीची सुनावणी ठाणे जिल्हा न्यायालयात सुरू होती. यासाठी आरोपीची पत्नी देखील न्यायालयात आली होती. या गुन्ह्यातील पिडीत मुलीचे वडीलही न्यायालयात उपस्थित होते. यावेळी आरोपीची पत्नी आणि पिडीत मुलीचे पिता यांच्यात न्यायालयात वाद झाला. या वादात सिंह यांनी आरोपीच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करून मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याची तक्रार आरोपीच्या पत्नीनं पोलीसांकडे केली आहे. पोलीस यामागील तथ्य तपासत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *