social TMC

वृक्षवल्ली प्रदर्शन आयोजित करणा-या महापालिकेनंच प्रवेशद्वारासमोर झाडांची बेफिकीरपणे छाटणी केल्याचा ठाणे मतदाता जनजागरण अभियानाचा आरोप

वृक्षवल्ली प्रदर्शन आयोजित करणा-या ठाणे महापालिकेनं या प्रदर्शनाकरिता वडाच्या झाडाच्या फांद्या बेफिकीरपणे कापल्या आहेत. ठाणे महापालिकेतर्फे आजपासून रविवारपर्यंत रेमण्डच्या मैदानावर वृक्षवल्ली प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या प्रदर्शनासाठी प्रवेशद्वारावर असलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या बेफिकीरपणे कापण्यात आल्या आहेत. याबाबत ठाणे मतदाता जनजागरण अभियानानं आक्षेप नोंदवला आहे. एकीकडे वृक्षवल्ली प्रदर्शन आयोजित केलं जात असताना दुसरीकडे वृक्षवल्ली प्रदर्शनाकरिताच वृक्षतोड करून महापालिका कोणता संदेश देऊ इच्छिते असा प्रश्न ठाणे मतदाता जनजागरण अभियानानं उपस्थित केला असून याचं उत्तर आयुक्त देणार की बेकायदा वृक्ष प्राधिकरण समिती देणार असाही प्रश्न ठाणे मतदाता जनजागरण अभियानानं उपस्थित केला आहे. या प्रकाराबाबत ठाणे मतदाता जनजागरण अभियानातर्फे वर्तकनगर पोलीसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *