education

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला महाविद्यालयात एका ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला महाविद्यालयात एका ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ग्रंथ प्रदर्शनात वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विं. दा. करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ४ ज्ञानपीठ विजेत्या लेखकांच्या साहित्य प्रदर्शनाबरोबरच मराठी भाषेतील लक्षवेधी साहित्य कृती पाहता येत आहेत. मराठी भाषेतील विविध ज्ञानकोष, शब्दकोष, विश्वकोष, मराठी नियतकालिकांची सूची, मराठी वाड़मय कोष, प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन चरित्र कोष, मराठी तत्वज्ञान, अभिनव मराठी ज्ञानकोष, मराठी रियासत, समग्र ना. सी. फडके, संपूर्ण शेक्सपियर, समग्र सेतु माधवराव पगडी, महाभारत, पुराण, राजर्षी शाहू गौरव ग्रंथ अशाप्रकारचं विविध साहित्य या प्रदर्शनात पहायला मिळत आहे. या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *