sports

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एअर इंडियाच्या संघाला तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाला विजेतेपद

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एअर इंडियाच्या संघानं तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघानं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेमध्ये पुरूषांचे आणि महिलांचे प्रत्येकी १८ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना एअर इंडिया विरूध्द युनियन बँक यांच्यात झाला आणि एअर इंडियानं हा सामना एकतर्फी जिंकत विजेते पदावर आपलं नाव कोरलं. महिला गटाचा अंतिम सामना पुण्याच्या जिजाऊ आणि मुंबईच्या शिवशक्ती यांच्यात झाला. राजमाता जिजाऊ संघानं चांगला खेळ करत हा सामना जिंकत विजेते पदावर आपलं नाव कोरलं. या स्पर्धेत युनियन बँकेला द्वितीय क्रमांक, देना बँकेला तृतीय क्रमांक तर सेंट्रल बँकेला चतुर्थ क्रमांक मिळाला. महिलांच्या गटात शिवशक्तीला द्वितीय, सुवर्णयुगला तृतीय तर मुंबईच्या महात्मा गांधी संघाला चतुर्थ क्रमांक मिळाला. पुरूष गटात अजिंक्य खापरे उत्कृष्ट चढाई, सोमवीर शेखर उत्कृष्ट पकड, सिध्दार्थ देसाई अष्टपैलू खेळाडू तर कमलेश नांदोसकर याची उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड झाली. महिला गटात पूजा यादव – उत्कृष्ट चढाई, मानसी सावंत – उत्कृष्ट पकड, सायली किरपाळे – अष्टपैलू खेळाडू तर सोनाली हळवीची उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड झाली. सर्व विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *