festival

मकरसंक्रांत अशुभ नाही – दा. कृ. सोमण

मकरसंक्रांतीपासून दिनमान वाढत जाते. दिनमान वाढत जाणं हे अशुभ कसं असू शकेल असं सांगून मकरसंक्राती अशुभ म्हटली जात असली तरी मकरसंक्रांती अशुभ नाही असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. येत्या रविवारी म्हणजे १४ जानेवारीला दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करत आहे. या मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी १ वाजून ४६ मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. सूर्यानं २१ डिसेंबर रोजी जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश केला त्या दिवसापासून आपल्याकडे दिनमान वाढू लागले आणि त्या दिवसापासून उत्तरायणारंभ होतो. वर्षभरात ज्यांच्याशी मतभेद किंवा भांडण झालं असेल त्यांना या दिवशी तिळगूळ देऊन गोड बोलण्यासंबंधी सांगितलं जातं. मकरसंक्रांतीच्या पुण्यकाळात गरीब, गरजू लोकांना दान देण्यास सांगण्यात आलं आहे. मकरसंक्रांतीला काळं वस्त्र नेसण्याची पध्दत आहे. काळ्या रंगाची वस्त्रं थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवतात असं सोमण यांनी सांगितलं. मकरसंक्रांतीचा आणि २४ जानेवारीचा काहीही संबंध नाही असं सांगून सोमण यांनी २०८५ पर्यंत मकरसंक्रांत कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येणार आहे तर २१०० पासून निरयन मकरसंक्रांत १६ जानेवारीला येणार आहे. अशारितीने दिवस पुढे पुढे जात ३२४६ मध्ये निरयन मकरसंक्रांती १ फेब्रुवारीला येईल तर पुढच्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये मकरसंक्रांत १५ जानेवारीला येणार असल्याची माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *