TMC

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत ठाण्यात स्वच्छ सर्वेक्षण सुरू

केंद्र शासनानं सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत ठाण्यात स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं आहे. केंद्र शासनाद्वारे स्वच्छता मोहिमेमध्ये महापालिकेनं केलेल्या मोहिमेची पाहणी केली जात होती. पण यंदा प्रथमच स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत नागरिकांचा या मोहिमेत किती सहभाग आहे, त्यांचा प्रतिसाद कसा आहे याची नोंद या सर्वेक्षणात घेतली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहर किती स्वच्छ आहे, शहरातील नागरिकांनी कचराकुंड्यांचा कसा वापर केला आहे. नागरिक ओला आणि सुका कचरा याचं वर्गीकरण करतात का, १०० टक्के शौचालयाचा वापर होतो का अशा विविध गोष्टींची नोंद या स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत केली जात आहे. शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *