दिव्यांग मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी प्रशासनातर्फे विविध सुविधा

विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या १८ मतदारसंघात १० हजार ४८९ दिव्यांग मतदार असून या मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून सर्वाधिक मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आली आहेत. दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामध्ये व्हील चेअर, रिंगरूट बससेवा, रिक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारानं प्रभाग अधिका-यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना या सुविधा दिल्या जाणार आहेत. दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना कोणत्याही ठिकाणी मतदान करताना अडचण आल्यास किंवा त्यांना काही मदत हवी असल्यास १९५० या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading