Ncp political shivsena

वसंत डावखरे यांची उणीव सतत भासत राहील – पालकमंत्री

राजकारणामध्ये विरोधकांना संपवण्याचे दुर्दैवी प्रकार सुरू असताना विरोधी पक्षाला मोकळ्या वातावरणात काम करायला मिळालं पाहिजे असं म्हणणारे वसंत डावखरे हे व्यक्ती नसून संस्था होते. त्यांची उणीव सतत भासत राहील असे भावपूर्ण उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना काढले. वसंत डावखरे यांच्या निधनानंतर आयोजित शोकसभेत ते बोलत होते. ठाण्याच्या विकासात डावखरे यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं असून त्यांनी नेहमीच राजकीय अभिनिवेश बाजूला सारून विकासाला प्राधान्य दिलं आहे. डावखरे कुण्या एका पक्षाचे नव्हते तर संपूर्ण ठाणे शहराचे होते. प्रत्येक समस्या ही त्यांनी स्वत:ची समस्या समजून सोडवल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, सनदी अधिकारी, खासदार, आमदार, पत्रकार अशा अनेकांनी डावखरे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *