शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची किसननगर शिवसेना शाखेला भेट

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल किसननगर शिवसेना शाखेला भेट दिली. शिवसेना प्रमुखांनंतर उध्दव ठाकरे यांनी या शाखेला भेट दिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे शाखा प्रमुख असताना त्यांनी या शाखेची स्थापना केली होती. ठाकरे यांनी शाखेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि अभ्यागतांसाठी ठेवलेल्या वहीमध्ये त्यांनी अभिप्रायही नोंदवला. १९८४ मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहका-यांनी ही शाखा बांधली. किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे बांधलेल्या या शाखेच्या माध्यमातूनच शिवसेना या भागात रूजली. वागळे इस्टेटचा परिसर हा शिवसेनेसाठी भक्कम तटबंदीच असून उध्दव ठाकरेंनी भेट देणे हा आपला सन्मान असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading