मतदान जनजागृती अभियानांतर्गत लिटिल फ्लॉवर शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली मतदान शपथ

आई, बाबा, काका, मावशी, आत्या यांना २१ ऑक्टोबरला मतदानाला नक्की पाठवू असं आश्वासन लिटिल फ्लॉवर शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलं आहे. मतदान जनजागृती अभियानांतर्गत लिटिल फ्लॉवर शाळेतील विद्यार्थ्यांनी आज मतदान शपथ घेतली त्यावेळी या विद्यार्थ्यांनी हे आश्वासन दिलं. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं अनिवार्य आहे. मतदानाच्या दिवशी घरातील १८ वर्षावरील सगळ्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्ही देशाचं उज्ज्वल भविष्य आहात. तुमचेही १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करायला विसरू नका असं त्यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading