कल्याणात भरारी पथकानं एका गाडीतून केली १२ लाख ४८ हजारांची रोकड जप्त

कल्याणात भरारी पथकानं एका गाडीतून १२ लाख ४८ हजारांची रोकड जप्त केली आहे. कल्याणमध्ये काल सुभाष चौकात साडेआठच्या सुमारास उल्हासनगरच्या दिशेनं येणा-या संशयित गाडीची तपासणी कल्याण पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक प्रमुख दामोदर साळवी आणि त्यांच्या सहका-यांनी केली असता या गाडीमध्ये १२ लाख ४८ हजारांची रोकड सापडली. याबाबत वाहन चालकाकडे विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही. त्यामुळं ही रक्कम जप्त करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading