मुंबई उच्च न्यायालयाची पुन्हा मेट्रो ४ प्रकल्पातील वृक्षतोडीस स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा मेट्रो ४ प्रकल्पातील वृक्षतोडीस स्थगिती दिली आहे. मेट्रो ४ म्हणजे कासारवडवली ते वडाळा या मार्गावर ही स्थगिती लागू राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वकीलानं ही झाडं रस्त्याच्या मध्यभागी असून ती जंगली झाडे नसल्यानं ती कापली तरी पर्यावरणास कोणताही धोका पोहचत नाही असा युक्तीवाद केला. त्यास याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी आक्षेप घेऊन ही पूर्ण वाढलेली झाडं असून ती कापल्यास पर्यावरणास मोठा धोका होऊ शकतो असा युक्तीवाद केला. याबाबत प्राधिकरणाकडे कोणतेही फोटो नसल्यामुळे न्यायालयानं स्थगिती दिली आहे. मेट्रो ४ ही गरजेची आहे पण ती भूमिगत करावी यासाठी ठाणे नागरी प्रतिष्ठान आणि रोहित जोशी यांनी एक याचिका दाखल केली आहे. ही मेट्रो भूमिगत नेल्यास या मार्गावरील पूर्ण वाढलेले १५०० वृक्ष वाचतील. रस्तेही पूर्ण वापरता येतील आणि ठाणे रेल्वे स्थानकास मेट्रो जोडणं सोयीचं होईल अशी भूमिका याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading