भिवंडीतील एका गोदामावर कारवाई करून ५ लाख ४० हजार रूपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा जप्त

ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं भिवंडीतील एका गोदामावर कारवाई करून ५ लाख ४० हजार रूपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा जप्त केला आहे. अंमलीविरोधी पथकाचे अधिकारी-कर्मचारी गस्त घालत असताना भिवंडीतील फिरदोस कॉम्प्लेक्स येथील एका गोदामात तंबाखूजन्य गुटखा साठवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकानं गोदामाची तपासणी केली असता या गोदामात अवैधरित्या साठवणूक केलेला ५ लाख ४० हजार रूपयांचा तंबाखूजन्य गुटखा सापडला. याप्रकरणी महम्मद खलिद यांना अटक करण्यात आली आहे. हा गुटखा कोणी पुरवला याची चौकशी पोलीस करत आहेत. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading