मतदानाच्या दिवशी अथवा अगोदर जाहिरात प्रसिध्द करण्यापूर्वी प्रमाणित करून घेणं आवश्यक

मतदानाच्या दिवशी तसंच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिध्द करायच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणित करून घेणं बंधनकारक असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अफवा पसरवणा-या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी अथवा त्या अगोदरच्या दिवशी प्रसिध्द झाल्यास निवडणूक प्रक्रियेवर विपरित परिमाण होऊ शकतो. अशा जाहिराती प्रसिध्द झाल्यास विरोधी पक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळं त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी मतदानाच्या तसंच त्याच्या अगोदरच्या दिवशी जाहिराती प्रसिध्द करायच्या झाल्यास जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिध्द करता येणार नाहीत असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading