ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात शिकाऊ वकीलाच्या हातातून दहा हजारांची रोकड लांबवण्याचा प्रकार

ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात शिकाऊ वकीलाच्या हातातून दहा हजारांची रोकड लांबवण्याचा प्रकार काल घडला. भिवंडीत राहणारे संकेत पाटील हे ठाणे सत्र न्यायालयातील राजय गायकवाड यांच्याकडे शिकाऊ वकील म्हणून काम करतात. गायकवाड यांच्याकडे सुनिल मोरे हा देखील न्यायालयीन काम करतो. काल संकेत पाटील हे गायकवाड यांच्या दोन अशीलांनी दिलेली १० हजार रूपयांची रोकड घेऊन न्यायालयाच्या आवारात उभे होते. त्यावेळी दुपारी दीडच्या सुमारास सुनिल मोरे तिथे आला आणि त्याने ही रोकड गायकवाड यांनी आपल्याकडे देण्यास सांगितल्याचा निरोप पाटील यांना दिला. पाटील गायकवाडना फोन लावून याबाबत खात्री करत असतानाच सुनिल मोरेनं रोकड हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पाटील यांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading