प्लास्टीकविषयी जनजागृतीसाठी माजिवडा पूलाखाली सादर करण्यात आली लेक ३५ ही कलाकृती

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे माजिवडा उड्डाण पूलाखाली प्लास्टीक संकलन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. यासंबंधी जागरूकता निर्माण करण्याकरिता रचना संसद ॲकॅडमी ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची एक कार्यशाळा झाली. या केंद्रासमोरील मोकळ्या जागेत प्लास्टीकच्या पुनर्वापरातून कला या विषयावर हेतल शुक्ला, रचना संसदच्या प्रेरणा ठक्कर आणि ठाण्यातील स्वत्वचे श्रीपाद भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. ठाणे हे एकेकाळी तलावांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. ठाण्यामध्ये एकेकाळी ६४ पेक्षा अधिक तलाव होते. मात्र आता त्यातील ३५ तलावच शिल्लक राहिले आहेत. आजोबांच्या काळात नदी तलावात पाणी दिसलं. आईबाबांच्या काळात पाणी नळातून पाहता आलं. आता बाटलीत पाणी दिसत असून २०३५ मध्ये कसं दिसेल असं एक फ्रेंच गाणं आहे. त्या आशयाची एक कलाकृती प्लास्टीक बाटल्यांच्या सहाय्यानं तयार करण्यात आली आहे. लेक ३५ असं या कलाकृतीत लिहिलं असून एल ए के ई अशी अक्षरं बाटल्यांच्या सहाय्यानं तयार करण्यात आली आहेत. त्यातील ई हा उलटा लिहिण्यात आला आहे. वेळीच पर्यावरण वाचवलं नाही तर मानव जातीच्या अस्तित्वालाच असलेला धोका यातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांचं मार्गदर्शन आणि महापालिकेचं सहकार्य या उपक्रमास लाभलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading