स्टार टॉरटॉईज जातीची ४ दुर्मिळ कासवं हस्तगत – एकाला अटक

स्टार टॉरटॉईज जातीच्या दुर्मिळ कासवांची विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला वन विभागानं पकडलं आहे. वसंतविहार येथील बालाजी ॲक्वेरियम या मासे आणि पक्षी विक्री करणा-या दुकानात स्टार टॉरटॉईज या प्रजातीचे कासव विकले जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वन विभागानं याबाबत तपासणी केली असता या दुकानाचे मालक शिवा नाडार यांच्या टेबलाखालील प्लास्टीकच्या बादलीमध्ये ४ स्टार टॉरटॉईज या दुर्मिळ जातीची कासवं आढळली. याबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याचं समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं ही कासवं जप्त करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. स्टार टॉरटॉईज या जातीचं कासव बाळगणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा आहे. नाडार यांना याप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading