आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणारी बॅडमिंटन अकादमी ठाण्यामध्ये सुरू करण्याचं उद्धव ठाकरेंचं आश्वासन

आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणारी बॅडमिंटन अकादमी ठाण्यामध्ये सुरू करण्याचं आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलं आहे. ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उध्दव ठाकरे बोलत होते. शिवसेनेची सत्ता असलेली ठाणे महापालिका अशी अकादमी उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असंही उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. मात्र या बदल्यात आपली एक अपेक्षा असून एका तरी स्थानिक खेळाडूनं ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवावं असं उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीच्या श्रीकांत वाड यांचा उध्दव ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्रीकांत वाड यांनी सांगितलं की, ठाण्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नसल्यामुळं ठाण्यातील अनेक खेळाडूंना प्रशिक्षणासाठी हैद्राबाद अथवा बेंगलोरला जावं लागतं. महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण संस्थेतून ३२ आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, ७ शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, १६ राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे खेळाडू तयार झाले आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading