मुख्यमंत्र्यांची ठाण्यातील सभा ठरली गैरसोयीची

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची होणारी सभा ही ठाणेकरांच्या दृष्टीनं गैरसोयीचीच ठरली आहे. संजय केळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची ठाण्यात सभा होत असून या सभेसाठी महापालिकेसमोरील रस्त्यावरच व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. आज सकाळी व्यासपीठ उभारण्याचं काम सुरू असताना संपूर्ण रस्ताच रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळं ठाणेकरांना लांबून वळसा मारून जावं लागत होतं. नंतर हा रस्ता खुला करण्यात आला. पण या रस्त्यावरच सभेसाठी व्यासपीठ उभारण्यात आलं असून जवळपास ७५ टक्के रस्ता सभेसाठी व्यापण्यात आला आहे. सभेपूर्वी काही वेळ या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार असून त्यामुळं या परिसरात मोठ्या वाहतूक कोंडीची भीती व्यक्त होत आहे. या रस्त्यावर संध्याकाळी नेहमीच वाहतूक कोंडी असते. सभेमुळं त्यात आणखी भर पडणार आहे. सभेसाठी आलेल्या गाड्यांमुळे आजूबाजूच्या रस्त्यांनाही त्याचा फटका बसणार असून एकप्रकारे मुख्यमंत्र्यांची सभा ही ठाणेकरांच्या दृष्टीनं गैरसोयीचीच ठरली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading