घोडबंदर रस्त्यावर झालेल्या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

घोडबंदर रस्त्यावर काल रात्री झालेल्या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल रात्री साडेदहाच्या सुमारास दिलीप विश्वकर्मा, पत्नी चंद्रावती आणि त्यांची ३ वर्षीय मुलगी प्रांजल हिच्यासह आपल्या दुचाकीवरून भाईंदरहून ठाण्याला येत होते. भाईंदरपाडा येथील श्रीहरी इमारतीजवळ खड्डा चुकवताना एका ट्रेलरनं धडक दिल्यामुळे चंद्रावती आणि प्रांजल या मायलेकी ट्रेलरच्या चाकाखाली आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप विश्वकर्मा हे किरकोळ जखमी झाले. ट्रक चालक अपघाताची माहिती न देताच पळून गेला. ट्रक चालक चंद्रशेखर बिष्णोई याला पोलीसांनी अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading