ठाणे महापालिकेनं निष्काळजीपणामुळं लावलेल्या फलकामुळे ज्येष्ठ पत्रकार जखमी

ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी मंगेश विश्वासराव हे ठाणे महापालिकेनं निष्काळजीपणामुळं लावलेल्या फलकामुळे जखमी झाले आहेत. मंगेश विश्वासराव हे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गावदेवी मंदिराजवळ रिक्षातून उतरून रस्ता क्रॉस करत होते. रेल्वे स्थानकाच्या दिशेनं जात असताना स्कायवॉकच्या भिंतीवर त्यांचे डोके आपटले आणि डोक्याला जखम झाल्यामुळे ते खाली कोसळले. डोक्याला जबर मार लागून त्यातून रक्तस्राव होऊ लागला. अशातच त्यांच्यासोबतच्या दोन मित्रांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले. विश्वासराव यांच्या डोक्यावर टाके घालण्याची वेळ आली. ठाणे रेल्वे स्थानक भागातील स्कायवॉकवरील फलक निष्काळजीपणे लावण्यात आल्यानं रोज प्रवासी जखमी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळं निष्काळजीपणे लावलेले हे फलक तात्काळ काढण्यात यावेत अशी मागणी मंगेश विश्वासराव यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading