BJPpolitical

ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर संघ संचलनात सहभागी

निवडणुकीच्या धावपळीत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर हे संघ संचलनात सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमीला संघ संचलन केलं जातं. या संचलनामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संजय केळकर सहभागी झाले होते. संघातर्फे दरवर्षी शहरात विविध ठिकाणी संचलन आयोजित केले जाते. यंदा सरस्वती मराठी शाळेपासून संचलनाला सुरूवात झाली. नौपाडा, गोखले रोड, पाचपाखाडी अशा विविध परिसरात हे संचलन करण्यात आलं. पाचपाखाडी परिसरात हे संचलन आल्यावर संघ स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.

Comment here