sports

भारतीय शालेय खेळ स्पर्धेत लॉन टेनिस या खेळात ११ पदकं पटकावून राज्याला अव्वल स्थान

सीआयएससीई भारतीय शालेय खेळ स्पर्धेत लॉन टेनिस या खेळात महाराष्ट्र संघानं देशात अव्वल स्थान पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. बंगलोर येथे झालेल्या भारतीय शालेय खेळ स्पर्धेत राज्यानं लॉन टेनिस या खेळात ११ पदकं पटकावून अव्वल स्थान पटकावलं. १४ वर्षीय मुलं-मुली आणि १७ वर्षीय मुलं-मुली या दोन्ही गटात राज्याला सुवर्णपदक मिळालं. वैयक्तीक स्पर्धेत १७ वर्षीय मुलं-मुली गटानं तसंच १४ वर्षीय मुलं-मुली गटानं प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत देशातील १७ राज्यातील संघ सहभागी झाले होते.

Comment here