Election

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात प्लास्टीक मुक्ती अभियान

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात प्लास्टीक मुक्ती अभियान चालवण्यात आलं आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामधील या मतदारसंघात प्रथमच असं अभियान चालवण्यात आलं असून काल या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ओवळा-माजिवडा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे प्रताप सरनाईक, बहुजन समाज पक्षाचे उत्तम तिरपुडे, बहुजन मुक्ती पार्टीचे अतुल्ला खान, वंचित बहुजन आघाडीचे किशोर तालेराव, महाराष्ट्र क्रांती सेनेचे रविंद्र साळुंखे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात ८८८ दिव्यांग मतदार असून या मतदारांच्या सुविधेसाठी २ लो फ्लोअर बस आणि ५० रिक्षांची व्यवस्था करण्यात आल्याचं या मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी सतिश वागळ यांनी सांगितलं.

Comment here