जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकनाथ शिंदे अर्ज दाखल करण्यासाठी भव्य मिरवणुकीनं रवाना झाले. एकनाथ शिंदे यांनी वडील, पत्नी, मुलगा आणि सून यांच्या समवेत आपला अर्ज दाखल केला. एकनाथ शिंदे हे २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. २००९ मध्ये या मतदारसंघाचं विभाजन झालं. त्यानंतरही २०१४ मध्ये त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. सध्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद ते भुषवत असून विविध कामं मार्गी लावण्याचा त्यांचा दावा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading