पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांसमोर विविध प्रकल्पांचं सादरीकरण

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमोर काल महापालिकेच्या खाडी किनारा विकास प्रकल्प, महामेट्रो, अंतर्गत मेट्रो, सॅटीस पूर्व, नवीन रेल्वे स्टेशन, कळवा ब्रीज, नागरी समूह विकास योजना, नवीन ठाणे आणि कमांड कंट्रोल सेंटर या प्रकल्पांसह विविध प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं. पोलीस आयुक्तांनी यावेळी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. महामेट्रोच्या सादरीकरणाच्या वेळी पोलीस आयुक्तांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल यावर तपशीलवार चर्चा केली. ठाणे रेल्वे स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पाच्या कामास सुरूवात झाल्यानंतर निर्माण होणारी वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल याविषयीही त्यांनी चर्चा केली. पोलीस आयुक्तांनी नागरी समूह विकास योजनेचीही सविस्तर माहिती घेतली. कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर या प्रकल्पाची माहिती घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नवीन ठाणे स्टेशनचे आराखडे, खारेगाव आणि दिवा पादचारी पूल, कळवा पूल, नवीन ठाणे शहर, घोडबंदर बाह्यवळण रस्ता, तीन हात नाका येथील ग्रेड सेप्रेटर, पीआरटीएस अशा विविध प्रकल्पांचं सादरीकरण पोलीस आयुक्तांसमोर करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading