ठाणे शहर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडेच – केळकरांना पुन्हा उमेदवारी

ठाण्यातून संजय केळकर आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. भारतीय जनता पक्षानं आज आपली पहिली यादी जाहीर केली असून या पहिल्या यादीत संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेनं ठाणे शहर मतदारसंघ मिळावा म्हणून प्रयत्न चालवले होते. या मतदारसंघातून नरेश म्हस्के निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र युतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाकडेच कायम राहिली आणि पक्षानंही पुन्हा संजय केळकर यांनाच उमेदवारी दिली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अपेक्षेनुसार शिवसेनेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना उमेदवारी मिळणार याबाबत खात्रीच होती. ठाण्यामध्ये २५ वर्षात प्रथमच भगवा फडकवण्याचा मान एकनाथ शिंदे यांनी मिळवल्यानंतर पक्षात एकनाथ शिंदे यांचं वजन चांगलंच वाढलं होतं. एकनाथ शिंदे यांनी काही दिवस विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यामुळं पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळणार याबाबत दुमत नव्हतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading