शिवसेनेचे काही उमेदवार जाहीर

शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांची युती होण्याची घोषणा होणं अद्याप बाकी असतानाच शिवसेनेनं काल आपल्या काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. निवडणुकीत पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट करण्यासाठी पक्षातर्फे हा एबी फॉर्म दिला जातो. एबी फॉर्म देणं म्हणजे उमेदवाराची निश्चिती असते. ठाण्यातील काही आमदारांना शिवसेनेनं एबी फॉर्म दिले आहेत. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामधून प्रताप सरनाईक यांना तिस-यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याण ग्रामीण मधून सुभाष भोईर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. एकनाथ शिंदे यांचीही उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अंबरनाथमध्ये बालाजी किणीकर, भिवंडी पूर्वमध्ये रूपेश म्हात्रे तर भिवंडी ग्रामीण मध्ये शांताराम मोरे यांनाही एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading