खवले मांजराची तस्करी करणा-या तिघांना गजाआड करण्यात पोलीसांना यश

ठाण्यामध्ये खवले मांजराची तस्करी करणा-या तिघांना गजाआड करण्यात पोलीसांना यश आलं आहे. खवले मांजराचे खवले विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना मुंब्रा पोलीसांनी अटक केली आहे. या तिघांकडून खवले मांजराचे खवले हस्तगत करण्यात आले असून या खवल्यांची किंमत ४० लाख रूपये असल्याची माहिती पोलीसांनी दिली. संरक्षित वन्यजीवामध्ये खवले मांजर मोडतं. खवले मांजराच्या खवल्यांचा औषध तसंच जादूटोण्यासाठी उपयोग केला जातो. मुंब्र्यातील पारसिक सर्कल येथील अमित गार्डनजवळ काही व्यक्ती वन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मुंब्रा पोलीसांच्या एका पथकानं सापळा रचून त्या ठिकाणी आलेल्या तिघांना ताब्यात घेतलं. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या एका हिरव्या रंगाच्या बॅगेत खवले मांजराचे खवले आढळून आले. पोलीसांनी या तिघांनाही अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading