विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक निरिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यामध्ये विधानसभेचे १८ मतदारसंघ असून या प्रत्येक मतदारसंघासाठी खर्च निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पथकांनी उमेदवाराच्या खर्चावर बारकाईनं लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची बाब निवडणूक खर्च अहवालात समाविष्ट होईल याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे. पोलीस, परिवहन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमण्यात आलेले भरारी पथक, स्थिर निगराणी पथकं यांनी वाहनांची तपासणी करावी, निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठका यांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची निर्मिती करावी. परवानगीशिवाय कुठलीही सभा होणार नाही याची दक्षता घ्यावी, प्रचाराच्या वाहनांवर लक्ष ठेवावं, राजकीय पक्षांच्या आणि उमेदवारांच्या सभा यांचं चित्रीकरण करावं असं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading