घरफोडी करण्यासाठी आलेल्या चौकडीला रहिवाशांनीच रंगेहात पकडून पोलीसांच्या केले स्वाधीन

घरफोडी करण्यासाठी मुंबईतून ठाण्यात आलेल्या चौकडीला रहिवाशांनीच रंगेहात पकडून पोलीसांच्या स्वाधीन करण्याची घटना सावरकरनगर येथे घडली आहे. असगर शेख, सूर्या हरिजन, अयान शेख आणि मन्सूर अन्सारी हे चौघे दोन दुचाकीवरून सावरकरनगर येथील रिक्षा चालक हरिश्चंद्र यादव यांच्या घरी चोरीच्या आमिषानं आले. यातील असगर हा पहाटे यादव यांच्या घरात शिरला तर बाकी बाहेर दबा देत थांबले. यादव यांच्या पत्नीला मुलाच्या रडण्यामुळे जाग आली. तेव्हा असगरला पाहून तिने चोर चोर ओरडण्यास सुरूवात केली. तेव्हा असगरनं घराच्या पोटमाळ्यावरून खाली रस्त्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारीपाजारी आणि नातेवाईकांनी दुचाकीवरून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना पकडून पोलीसांच्या हवाली केले. असगरकडे यादव यांच्या घरातून चोरलेला मोबाईल आढळला अशी माहिती पोलीसांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading