बाबूभाई पेट्रोलपंप ते मीनाताई ठाकरे चौक येथील पूल होणार दुतर्फा

बाबूभाई पेट्रोलपंप ते मीनाताई ठाकरे चौक येथील पूल दुतर्फा होणार आहे. आमदार संजय केळकर यांनी अधिका-यांसमवेत या पूलाची पाहणी केली. ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी महापालिका आणि पोलीस अधिका-यांसमवेत आमदार संजय केळकर यांनी या पूलाची पाहणी करून या पूलावर दुतर्फा वाहतूक सुरू करावी अशी सूचना केली. त्यावेळी अधिका-यांनी लवकरच या पूलावरून दुतर्फा वाहतूक सुरू करण्याचं मान्य केलं. यामुळं वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading