वसंत डावखरे यांच्या तैलचित्राचं अनावरण

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचं एक तैलचित्र राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये लावण्यात आलं आहे. या तैलचित्राचं अनावरण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. चित्रकार महेश लाड यांनी हे चित्र रेखाटलं असून या कार्यक्रमाला ४ ते ५ माजी महापौरांसह २५ ते ३० वर्षातील नवे जुने नगरसेवक या हृद्य सोहळ्याला उपस्थित होते. आनंद दिघे आणि वसंत डावखरे यांची दोस्ती अनोखी होती. गडकरी रंगायतनमधील आनंद दिघे यांच्या छायाचित्राशेजारी वसंत डावखरे यांचं तैलचित्र लावलं असून निधनानंतरही एडी व्हीडी जोडी पुन्हा एकत्र दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading