ठाणे रेल्वे स्थानकात स्वयंचलित रक्तदाब तपास यंत्र सुरू

ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्यानं अत्याधुनिक पध्दतीचे स्वयंचलित रक्तदाब तपास यंत्र सुरू करण्यात आलं आहे. या रक्तदाब तपासणीसाठी आपला उजवा हात दंडापर्यंत मशिनमध्ये टाकून स्टार्ट बटन दाबल्यानंतर रक्तदाब तपासणी पूर्ण झाल्यावर रक्तदाब नोंदणीची प्रिंट मशिनमधून बाहेर येते. अगदी सोप्या आणि कमी वेळात ही रक्तदाब तपासणी करता येते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading