छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून खारकोपरपर्यंत लोकलसेवेची मागणी

नवी मुंबईतील उलवे परिसरातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी टर्मिनसहून खारकोपर पर्यंत उपनगरीय गाड्यांच्या फे-या सुरू कराव्यात अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. खारकोपर स्वतंत्र लोकल बरोबरच बेलापूर ते खारकोपर आणि नेरूळ ते खारकोपर पर्यंतच्या फे-या वाढवण्याची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून नवी मुंबईतील उलवे नोडचा वेगानं विकास झाला. मात्र उलवे नोड पर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे सहजपणे पोहचण्यासाठी मर्यादा येत आहेत. मध्य रेल्वेनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बेलापूर ते खारकोपर आणि नेरूळ ते खारकोपर रेल्वे सेवेला सुरूवात केली. मात्र प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळं लोकल सेवा अपुरी पडत आहे. लोकलच्या तुरळक संख्येमुळं अनेकवेळा प्रवाशांना गाडीत प्रवेशही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यात लोकलमधील वेळेचं अंतर जास्त असल्यामुळं प्रवाशांना गाडीत प्रवेशही मिळत नाही. नाईलाजाचे रिक्षा किंवा बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळं आमदार निरंजन डावखरे यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता यांच्याकडे खारकोपर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस लोकल सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading