शहरातील सर्व खड्डे तात्काळ भरण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

रस्ते दुरूस्तीची बीलं भांडवली खर्चातून न काढण्याचे आदेश देतानाच कोणते रस्ते दोषदायित्व कालावधीमधील आहेत आणि त्यांच्या दुरूस्तीसाठी किती खर्च केला आहे याची माहिती सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील रस्त्यांबाबत होणा-या तक्रारींच्या अनुषंगानं एका बैठकीचं आयोजन महापालिका आयुक्तांनी केलं होतं. शहरातील खड्ड्यांबाबत प्राप्त होणा-या तक्रारींच्या अनुषंगानं महापालिका आयुक्तांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्ड्यांबाबत आढावा घेऊन यापुढे प्रभाग समिती स्तरावरील सर्व यंत्रणा खड्डे भरण्याच्या कामाला लागावी असं सांगितलं. सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत विभाग यांनी आपापल्या विभागाशी संबंधित कामं प्राधान्यानं करावी सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत रस्ते दुरूस्तीची बीलं भांडवली खर्चात काढण्यात येऊ नयेत असे आदेश दिले. त्याचप्रमाणे शहरामध्ये कोणते रस्ते दोषदायित्व कालावधीतील आहेत आणि त्या रस्त्यांवर किती खर्च झाला या सर्व रस्त्यांची यादी आणि त्यांचा खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं. शहरातील सर्व अनधिकृत होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तात्काळ काढून टाकण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या असून पुन्हा धोकादायक इमारतींच्या संदर्भात पाहणी करावी आणि त्यानुसार कार्यवाही करावी असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading