क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण

ठाणे महापालिकेच्या वतीने ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणा-या गडकरी रंगायतनच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्मृतीस्तंभाबरोबर सावरकरांचे ने मजसी ने परत मातृभूमीला हे त्यांचे गीतच या स्मृती शिल्पात चित्रबद्ध करण्यात आले आहे. अंदमानच्या कारागृहातील स्वतंत्र भारताचे कृतीशिल स्वप्न पाहणारे सावरकर,तेथील जेलमधील त्यांची अवस्था,मनातील चलबिचल असाहयता त्यातून निर्माण झालेले काव्य हे दृश्य स्वरुपात स्मृतीस्तंभाद्वारे मांडण्यांत आले आहे. या शिल्पाची निर्मिती जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् मधून 1989 साली पदवी घेतलेले सुनिल चौधरी यांनी केली आहे. जवाहरबाग स्मशानभूमीचे लोकार्पणही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पर्यावरणपूरक पद्धतीने या स्मशानभूमीचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले असून लाकुड आणि डिझेलचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading