ठाण्यामध्ये मल्टी स्पेशालिटी रूग्णालय उभारण्याची योजना

ठाणे जिल्हा रूग्णालयाच्या ८३ वर्ष जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारण्याच्या प्रयत्नाला गती मिळाली असून या सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या संकल्प चित्राचं अनावरण उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झालं. ५७४ खाटांच्या या सुपर स्पेशालिटी रूग्णालयासाठी राज्य सरकारनं ३१४ कोटी रूपयांचा निधी जमा केला आहे. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता रूग्णालयाची जागा अपुरी पडत असून अनेक अद्ययावत वैद्यकीय सुविधांअभावी रूग्णांची परवड होत आहे. पालकमंत्र्यांनी आरोग्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यावर जिल्हा रूग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रूग्णालयाला चालना मिळाली. मूळ ३३६ खाटांचं असलेल्या या रूग्णालयाची जागा आता ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रूग्णालय होत असून यापैकी १४० खाटा या हृदयरोग, मेंदू विकार, कर्करोग, मूत्ररोग आदी विकारांसाठी असणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा रूग्णालयाच्या २ सात मजली इमारती बांधल्या जाणार आहेत. एका इमारतीत अद्ययावत यंत्रसामुग्रीसह सुसज्ज जिल्हा रूग्णालय तर दुस-या इमारतीत विविध तपासणी विभाग कार्यरत असतील. सुसज्ज नेत्ररोग विभाग तयार करण्यात येणार असून अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त शस्त्रक्रिया गृह, लेसर उपचार पध्दती, रेटिना उपचार पध्दती अशा अनेक सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. सौर व्यवस्था, सेंट्रल ऑक्सीजन आणि सक्शन सिस्टीम, रेन हार्वेस्टींग, १०० शव ठेवण्याची क्षमता, शवागृह आदी सोयीसुविधा असणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading