politicalshivsena

गेल्या ५ वर्षात ३ हजार ३४५ कोटींची कामं कल्याण लोकसभा मतदारसंघात मंजूर

ठाण्यापुढील लोकसंख्या आणि रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या ५ वर्षात ३ हजार ३४५ कोटींच्या प्रकल्पांची कामं मंजूर झाली आहेत. यामध्ये ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम, उपनगरीय गाड्यांच्या फे-यांमध्ये वाढ, अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचं काम २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. कोपर स्थानकात ठाणे पश्चिमेकडील पादचारी पूल आणि डोंबिवली स्थानकातील कल्याणकडील पादचारी पूलाचं काम पावसाळा संपताच सुरू करण्यात येणार आहे. कल्याण रि-मॉडेलिंगचं काम येत्या ६ महिन्यात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. लवकरच १२ डब्यांच्या सर्व गाड्या १५ डब्याच्या करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Comment here