ठाण्यामध्ये आणखी एक विधी महाविद्यालय

ठाण्यामध्ये आणखी एका विधी महाविद्यालयाला परवानगी मिळाली आहे. ठाणे बेलापूर रस्त्यावरील विटावा जकात नाक्याजवळ जय भगवान लॉ कॉलेजला परवानगी मिळाल्यानं शहरामध्ये आणखी एका विधी महाविद्यालयाची सोय झाली आहे. जय भगवान लॉ कॉलेजमध्ये ३ आणि ५ वर्षाचा एलएलबी अभ्यासक्रम शिकवला जाणार असून ज्या विद्यार्थ्यांनी विधी विभागाची सामाईक परीक्षा दिली असेल आणि ज्यांना अद्याप प्रवेश मिळाला नसेल अशांना या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. अधिक माहितीसाठी ९७०२० ६५७७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading