crime

चकमक फेम अशी ओळख असलेल्या पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर

चकमक फेम अशी ओळख असलेल्या पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा राजीनामा गृह विभागानं मंजूर केला आहे. प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता गृह विभागानं राजीनामा मंजूर केल्यामुळे प्रदीप शर्मा विधानसभेची आगामी निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. १९८३ साली पोलीस दलात रूजू झालेले प्रदीप शर्मा हे बहुतांश काळ मुंबई गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते. २००८ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर ९ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रदीप शर्मा पुन्हा सेवेत परतले होते. त्यानंतर ते ठाणे क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत होते.

Comment here