festival

मोहरम भावपूर्ण वातावरणात

मुस्लिम महिन्याचा पहिला महिना म्हणजे मोहरम. मोहरम महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात मोहरम भावपूर्ण वातावरणात पाळला जातो. हा मोहरम आज पाळण्यात आला. हजरत इमाम हुसेन यांचा वध या महिन्यात झाल्यामुळं त्यांच्या दु:खद प्रसंगाची स्मृती म्हणून मुस्लिम धर्मीय मोहरम पाळतात. या उत्सवात ताजिया म्हणजे ताबुताला फार महत्व असतं. प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे चांदी, हस्तीदंत, शिसवी, चंदन, काच, बांबू, कागद अशा वस्तू वापरून ताबूत बनवतो. मोहरमच्या शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढली जाते. यावेळी गरीब लोकांना मोठ्या प्रमाणावर अन्नदान केलं जातं. विशेष म्हणजे हिंदू धर्मीय देखील या ताबूत मिरवणुकीत सहभागी होतात. मिरवणूक संपल्यानंतर सर्व ताबूत पुरले जातात. आपल्याकडे अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन मोहरम साजरा करतात.

Comment here