TMC

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमध्ये कळव्याच्या गुणसागर सार्जवनिक गणेशोत्सवास प्रथम पारितोषिक

ठाणे महापालिकेनं आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमध्ये कळव्याच्या गुणसागर सार्जवनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. ठाणे महापालिकेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव आरास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत २० गणेश मंडळांनी भाग घेतला होता. यामध्ये गोकुळनगरच्या जयभवानी मित्रमंडळाला द्वितीय तर शिवगर्जना मित्रमंडळाला तृतीय क्रमांक मिळाला. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळास चौथा, नौपाड्यातील नवअरूण मित्रमंडळास पाचवा क्रमांक मिळाला आहे. वागळे इस्टेट येथील जय भवानी सार्वजनिक मित्रमंडळास सहावा, शिवाई नगर येथील शिवाईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास सातवा क्रमांक मिळाला आहे. उत्कृष्ट मूर्तीकाराचं पहिलं बक्षीस महादेव नांदिवकर यांना, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सुनिल गोरे यांना तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस दीपक गोरे यांना मिळालं आहे.

Comment here