आमदार संजय केळकर यांची ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युशन असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य सल्लागार पदी नियुक्ती

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युशन असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे. आमदार संजय केळकर राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांबाबत विधानसभेत नेहमी आवाज उठवत असत. राज्य वृत्तपत्र विक्रेत्या संघटना गेल्या १०-१२ वर्षापासून कल्याणकारी मंडळाबाबत आग्रही होती. आमदार संजय केळकर यांनी प्रयत्न करून कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मंजूर करून घेतला. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी वेगळी अभ्यास समिती स्थापन करून घेतली. वृत्तपत्र विक्रेत्यांना परवडणारी स्वस्त घरं मिळावीत म्हणून ते आग्रही आहेत. वेळोवेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी ते पाठपुरावा करत असतात. म्हणून राज्य संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार आणि सुनिल पाटणकर यांनी आमदार संजय केळकर यांची राष्ट्रीय कमिटी सल्लागार पदी नियुक्ती करावी अशी सूचना केली होती. त्याची दखल घेत ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युशनच्या वतीनं आमदार संजय केळकर यांची राष्ट्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू असं केळकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading