स्टेट ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत श्री माँ विद्यालयाच्या गायत्री कासुल्लाने पटकावले सुवर्णपदक

चिपळूण येथील डेरवण येथे महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशन आयोजित 35 व्या महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत श्री माँ विद्यालयाच्या गायत्री कासुल्ला हिने सुवर्णपदक पटकाविले आहे.या स्पर्धेत एकूण 29 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ट्रायथलॉन प्रकारात लांब उडी, धावणे, गोळाफेक या तिन्ही प्रकारांत गायत्री कासुल्ला हिला 1876 गुण मिळाले. नोव्हेंबर महिन्यात विजयवाडा येथे होणा-या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी गायत्रीची निवड झाली आहे. सुशांत पटील आणि देव सिलका यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading