दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तिकीटाची तपासणी करणारा तोतया टीसी गजाआड

दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तिकीटाची तपासणी करणाऱ्या तोतया टीसीला रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने गजाआड केले. हा प्रकार गुरुवारी दिवा स्थानकात घडला. हा टीसी तिकीट तपासत असताना प्रवाशांना संशय आला. तेव्हा तोतया टीसी सलीम हुसेन शेख याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्याला गजाआड केले. दिवा येथील रहिवासी भानुदास मेस्त्री,पांडुरंग राणे, रविंद्र पवार हे लोकलने डोंबिवली येथून दिवा स्थानकावर फ्लॅट नंबर 1 वर आले. त्यावेळी टीसी सलीम शेख याने तिघांना अडवले. त्यांच्याकडे तिकीटाची मागणी केली. मात्र प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी टीसीकडे ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्र देण्यास शेख याने टंगळमंगळ करून फलाटावर लागलेली लोकल पकडून पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दिवा स्थानकावर कार्यरत असलेल्या रेल्वे पोलीसांनी प्रवाशांच्या मदतीने तोतया शेखला अटक केली. पोलीस चौकशीत त्याने आपले नाव सलीम शेख असल्याचे सांगितले. त्याच्याकडे टीसी असल्याचे ओळखपत्र नव्हते. दिवा रेल्वे पोलीसांनी सलीम शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading