२००० क्यू डब्ल्यू ७ नावाचा लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार असला तरी पृथ्वीला धोका नाही – दा. कृ. सोमण

२००० क्यू डब्ल्यू ७ नावाचा लघुग्रह शनिवार १४ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या ५३ लक्ष किलोमीटर अंतरावरून जाणार असला तरी पृथ्वीला धोका नसल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. या लघुग्रहाचा शोध ८ ऑगस्ट २००० मध्ये लागला. तो दर ६ हजार ९५६ दिवसांनी दर तासाला २३ हजार किलोमीटर वेगाने एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. हा लघुग्रह ६५० मीटर लांबीचा आणि २९० मीटर रूंदीचा आहे. यानंतर तो १९ ऑक्टोबर २०३८ रोजी पुन्हा पृथ्वीजवळून जाणार असल्याचंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading