सहाय्यक पोलीस अधिकारी स्नेहा कर्नाले यांची वर्ल्ड पोलीस गेम्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

ठाणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस अधिकारी पदावर काम करणा-या स्नेहा कर्नाले यांनी चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस गेम्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. त्यांनी ॲथलेटिक्समध्ये ३ सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे. कर्नाले या पोलीस दलात सेवा बजावत असताना क्रीडा क्षेत्रातही त्यांनी नैपुण्य मिळवलं आहे. गेली २९ वर्ष त्यांनी विविध ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होत चमकदार कामगिरी केली आहे. चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस गेम स्पर्धेत १००, २०० आणि ४०० मीटर स्पर्धेत सुवर्ण तर ८०० मीटर स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक मिळवलं आहे. १९९० मध्ये त्या पोलीस सेवेत कॉन्स्टेबल म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर खेळ, सेवा आणि कुटुंब अशी तिहेरी कसरत करत खेळातील सातत्य टिकवून ठेवलं आहे. आजपर्यंत त्यांनी सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा विविध देशातील स्पर्धेत सहभागी होत सुवर्ण कामगिरी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading