ठाणे महापालिकेच्या ४ प्रकल्पांचा स्कॉच पुरस्कारानं गौरव

प्रदूषण, हवामान मॉनिटरिंग ॲप, डीजी ठाणे, प्रॉपर्टी टॅक्स ॲसेसमेंट मॉड्युल आणि ग्रीन ठाणे या ४ प्रकल्पांना स्कॉच या संस्थेनं चार ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कारानं गौरवलं आहे. दिल्लीत झालेल्या विशेष समारंभात महापालिकेला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्कॉच स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्यांनी सहभाग घेतला होता. स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट करिता निवड प्रक्रिया अतिशय काटेकोर असून प्रस्तुत प्रकल्पांचे मूल्यांकन सादरीकरणाच्या आधारे ज्युरीकडून केले जाते. या स्पर्धेमध्ये ठाणे महापालिकेला मालमत्ता कर विभागाच्या प्रॉपर्टी टॅक्स ॲसेसमेंट मोड्युल, प्रदूषण विभागाच्या हवामान आणि हवेची गुणवत्तेची सद्यस्थिती दर्शवणारे मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईट, उद्यान विभागाच्या ग्रीन ठाणे आणि स्मार्ट सिटीच्या डीजी ठाणे या ४ प्रकल्पांसाठी पुरस्कार मिळाले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading